महाराष्ट्रातल्या जनतेला सीमाप्रश्नाबद्दल अधिकाधिक जागरूक करणे आणि सीमाभागातील जनतेला महाराष्ट्र शासनाशी जोडून घेणे, ही दुहेरी जबाबदारी आमच्यावर आहे
आपण सगळे जाणतो की, सीमाप्रश्न हा लक्षावधी लोकांच्या आस्थेचा प्रश्न आहे. या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना शासनापर्यंत निर्विघ्नपणे पोहोचता यावे, यासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे या दिशेने प्रयत्न चालू आहेत.......